Posts

Showing posts from August, 2017

ते दिन अजूनही आहेत!

Image
गावातील बालपण, खूप सुंदर होते, ते गाव तेथील नयनरम्य निसर्ग वगैरे आता लोप पावत चालला आहे, ते दिवस आता इतिहासजमा झाले आहेत असा सूर लोक का लावतात ते मला कळत नाही. आता शहरातील जगण्यात ते दिवस गेले हे मला अजिबात पटत नाही. गावाबद्दल किंवा त्या जुन्या दिवसांबद्दल खूप चांगलं चांगलं लिहिलं जातं पण आपलं सध्याचं जीवन त्याहून सुंदर आहे असं मला मनापासून वाटतं. माझं बालपण फोंडा, पणजी, मडगाव अशा शहरांमध्ये गेलं, आणि ते सुंदर मंतरलेले दिवस अजूनही संपलेले नाहीत. दुपारी शाळेतून घरी आलो कि आमच्या सोसायटीतील मित्रांच्या गराड्यात पत्ते आणि कॅरम खेळत दुपार निघून जायची. संध्याकाळी अर्थातच परत शाळेच्या मैदानावर फुटबॉल रंगायचा आणि रात्र टीव्ही आणि पुस्तकांच्या स्वाधीन असायची. महाभारत, शक्तिमान, जंगलबुक, त्याचबरोबर जीआयजो, ट्रान्सफॉर्मर्स, अशी कार्टून्स, आणि फ्रेंड्स सारख्या अजरामर मालिकांनि आमचं बालपण फुलवल. आज तीच पात्र सिनेमारुपात परत समोर येताना पाहून खूप आनंद होतो. उन्हाळ्याच्या सुटीत मडगावला मावशीकडे जाऊन पु.लं. देशपांडेची बटाट्याची चाळ, विश्वास पाटलांचे पानिपत अशा कादंबऱ्या आणि हार्डी बॉयस, फेमस फ

D.O.E. (डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश)

Image
“क्रिएटीव रायटिंगचा अभ्यास करताना मला  राज्यशास्त्रातील कोरड्या सिध्दांताहून वेगळं काहीतरी शिकण्याची आणि स्वतःच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याची संधी मिळेल.” गोवा विद्यापीठाच्या इंग्लिश विभागात सर्जनशील लेखनाच्या वर्गात प्रवेशासाठी केलेल्या अर्जात मी लिहिलं होतं. माझ्या मते क्रिएटीव रायटिंग केवळ एक पोरखेळ होता. किचकट सिध्दांत नाहीत,  गुंतागुंतीचे तह, शिखर परिषदा लक्षात ठेवण्याचा त्रास नाही; काहीतरी अचाट काल्पोकाल्पित कथा खरडून दिल्या कि झालं! राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्याकडे धोकेबाज राजकारणी आणि गुप्तहेरांच्या सुरस कथांचा भरपूर साठा होता. त्याच्या बळावर या इंग्लिश विभागातल्या कविता आणि नाटकं वाचणाऱ्या आणि परीकथांमध्ये रमणाऱ्या लोकांना मी सहज मात देईन असा मला विश्वास होता. आपलं मूळ क्षेत्र  सोडून इथे भलतीकडे घुसून आपण मोठी चूक करत आहोत हे माझ्या गावीही नव्हतं. या चुकीचं गांभीर्य माझ्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. इंग्लिश विभागातील माझी कामगिरी शेक्सपिअरच्या शोकांतीकेप्रमाणे दिवसागणिक करुण होत चालली होती. आमच्या राज्यशास्त्र विभागात एक गोष्ट आम्हाला पक्की श

बाबांस पत्र

प्रिय बाबा, मान्य; तुम्ही जगलात त्याच्या तुलनेत संपन्न असं जीवन मला देण्यासाठी तुम्ही फार कष्ट करता. मान्य; माझं जीवन बाहेरून सुखासीन वाटतं, पण मलाही काही समस्या आहेत. जरा समजून घ्या. होय. बरोबर म्हणता तुम्ही. आम्ही नव्या पिढीचे लोक भावना आणि नाती जपण्यापेक्षा प्रेक्टीकल जीवनाला जास्त महत्व देतो. बरोबर म्हणता तुम्ही की आम्ही कन्फ्युज्ड लोक आहोत. तुम्ही आम्हाला शिकवलेली मूल्यं आणि वास्तव जगातील जगण्याची रीत यामध्ये असलेली प्रचंड दरी बघून आम्ही कन्फ्युज होतो. आजूबाजूचा समाज, अर्थकारण, कल्पनेपेक्षाही वेगाने बदलताना पाहून आमचा गोंधळ उडतो. आपली संस्कृती जपण्याबाबत जितके तुम्ही जागरूक आहात, तितकेच आम्ही पण आहोत. मात्र आमचं दैनंदिन जीवन अधिक सुखकर करतील अशा नव्या गोष्टी आम्ही बिनदिक्कत स्वीकारतो. मान्य; आम्ही कायम फोन आणि इन्टरनेटला चिकटलेले असतो. मान्य; या गोष्टी आमच्या आरोग्याला घातक आहेत. पण बाबा, आज या गोष्टींशिवाय जीवन सुरळीत चालणंच कठीण आहे. इंटरनेटनं ज्ञानाची अनंत कवाडे खुली केलेली आहेत. त्यामुळे शिक्षणात आणि करियरमध्ये असणाऱ्या उच्च अपेक्षा आणखीनच वाढल्या आहेत. सोशियल मीड

नैराश्यावर बोलू काही...

Image
प्रोफेशनल जीवनात येणारा स्ट्रेस आणि त्यामुळे जडणाऱ्या  शारिरीक व्याधींबद्दल आपण बरेच बोलतो व ऐकतो.  पण त्याचबरोबर जीवघेणी स्पर्धा आपल्या मानसिक आरोग्यावरही प्रचंड मोठा आघात करते. हृदयविकारानंतर जगात सर्वात कॉमन झालेला  आजार म्हणजे डिप्रेशन. डिप्रेशनवर एक सुंदर पुस्तक माझ्या वाचनात आले त्यावरच हा लेख आहे. मेट हेग ( Matt Haig .) या ब्रिटीश लेखकाने त्यात आपले डिप्रेशनचे अनुभव आणि त्यावर मिळवलेल्या विजयाचा प्रवास मांडला अहे. पुस्तकाचे नाव आहे रिझन्स टू स्टे अलाइव्ह. (Reasons to Stay Alive) मेट केवळ २४ वर्षाचा होता. तो आपल्या गर्लफ्रेंडसहित स्पेनमधील समुद्र्कीनार्यांसाठी साठी प्रसिद्ध असलेल्या इबिझा शहरात एका पॉश सी-फेसिंग विलामध्ये राहायचा आणि त्याचा जॉब होता इवेंट मेनेजर म्हणून  दर वीकेंडला पार्टी ओर्गनाइज कारणं . असं सर्व काही असताना त्याला डिप्रेशन आलं. आता काही लोक म्हणतील की विदेशात होतात असले प्रकर. आपल्याकडे परिवार आणि मित्रांचा भक्कम सपोर्ट असतो माणसाला. इथे नसेल इतकं डिप्रेशन वगैरे. चूक असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) ने २०१५ साली प्रसिध्द के

सतीश सोनक, प्राचीन रोम आणि आधुनिक जपान.

Image
सतीश सोनक यांच्या रूपाने गोव्याने अजून एक समाजिक कार्यकर्ता गमावला. त्यांनी खूप मोलाचे कार्य केले यात वाद नाही, पण हे विचारमंथन त्यांच्यावर नसून समाजाचा अशा कार्यकर्त्यांच्या मला जाणवलेल्या परिस्थिती बद्दल आहे. सोनक जी एकाच वेळी अनेक प्रश्न घेऊन लढत होते. वानरमारे लोकांच्या समस्या, भष्टाचार, व्यसनमुक्ती अशा अनेक आघाड्यांवर ते कार्यरत होते. असे अनेक कार्यकर्ते शेकडो प्रश्न घेऊन जास्तीत जास्त लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र यात त्यांची रोमन साम्राज्यासारखी गत होते. रोमन साम्राज्य आपल्या सैन्याबालावर अनियंत्रित पध्दतीने पसरत गेले. त्यामुळे मग साम्राज्यातील व्यवस्था, दळणवळण, आणि सैन्य यावर प्रचंड ताण आला आणि त्यामुळे राज्याचा लय झाला. आपले सामाजिक कार्यकर्ते असेच शेकडो प्रश्न घेऊन हजारो लोकांची मदत करायला दिवस रात्र धावत असतात. त्यात कित्येक जन आपली तहान भूक, झोप, आरोग्य याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. मग एक दिवस तो ताण असहाय्य होतो आणि मनुष्य कोसळतो. असे होण्यामध्ये त्या “गरीब, असहाय्य” जनतेचा पण मोठा वाटा असतो. एकदा कोणी मदत करते आहे असे दिसले कि मागचा पुढचा विचार न

आजचे तरुण वाचतात का?

Image
आपणा सर्वाना वाचक दिनाच्या शुभेच्छा. आज वाचन आणि पुस्तके यावर बर्याच चर्चा झडत असतील. आजच्या तरुणांचे वाचन कमी झाले आहे का? हा प्रश्न आज चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. “आजचे तरुण कमी वाचतात” हे विधानच मुळात चुकीचे आहे. इन्टरनेट वर उपलब्ध असलेली मुबलक माहिती आजचे तरुण कायम वाचत असतात. तसेच ब्लॉग, कंटेंट वेबसाईट, अशा  प्लेटफोर्मवरती लेखक व वाचक प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. आता पुस्तक हि त्यांची पहिली पसंती का नाही हा प्रश्न आहे. याचे कारण गेल्या काही वर्षात करमणुकीची अनेक साधने निर्माण झाली आहेत. व्हिडीओ गेम्स, संगीत, चित्रपट, इन्टरनेट, अशा अनेक गोष्टी आज आपले लक्ष आणि वेळ घेण्यासाठी स्पर्धा करतायत. पण त्यातही चेतन भगत सारखा मनुष्य तुफान लोकप्रिय आहे, अब्दुल कलमांची पुस्तके लाखो तरुणांना स्फूर्ती देत आहेत, शिवा ट्रिलॉजि सारखी नवी पुस्तके हातोहात खपत आहेत म्हणजेच वाचन संस्कृती टिकून आहे. हिंदुस्तान टाईम्स ने २०१३ मध्ये भारताच्या विविध महानगरांमधील ९८६ तरुण-तरुणींच्या केलेल्या एका पाहणीनुसार शहरी तरुणामधले साधारण ४२ टक्के लोक फिक्शन, २८ टक्के इतिहास आणि जागतिक घडामोडी, तर २१ टक्के लोक प्

विद्यार्थ्यांच्या आत्म्हत्याना जवाबदार कोण?

विषय गंभीर आहे. प्रस्तावनेत वेळ वाया न घालवता सरळ मुद्यावर येतो. आपल्या शाळा-कॉलेजमधले तरुण विद्यार्थी आत्महत्या करतायत. कोमल काळ्या उमलण्यापूर्वीच खुडल्या जातायत. का होतंय असं? मला वाटतं या प्रश्नाला दोन कंगोरे आहेत. पहिला, आपण फॉरमल शिक्षणाला दिलेलं अवाजवी महत्व. जर एखादा माणूस शाळा-कॉलेजात गेलाच नाही किंवा त्यातील परीक्षेत यशस्वी झाला नाही तर तो “ढ”, निकामी असं आपण समजतो. यावर उपाय म्हणून आठवीपर्यंत पास करा, अभ्यासाचा बोजा कमी करा वगैरे उपाय करून झाले पण तरी आत्महत्या थांबत नाहीत. याचं कारण आपण दुसऱ्या बाजूकडे लक्ष दिलेलं नाही. तो दुसरा आस्पेक्ट आहे पालक, शिक्षक आणि कमकुवत मनाचे विद्यार्थी. शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक आणि घरी पालक विद्यार्थ्यांना काय सांगत असतात? “एवढे कमी मार्क? तुझ्यात काही अर्थच नाही.” “नीट अभ्यास केला नाहीस तर कोणी नोकरी देणार नाही तुला” “तुला काय माहिती? बाहेरच्या जगात जगणं खूप कठीण असतं.” अशी वाक्य जर सतत कानावर पडत राहिली तर कुणाला वाटेल उत्साहाने अभ्यास करावासा? जगणं कठीण असतं हेच मनावर बिंबवलं गेलं तर का जगावसं वाटेल कुणालाही? याउलट आपण दुसरं उदा

किंडल विरुध्द कागद

Image
डिजिटल तंत्राज्ञानाने आज वाचन संस्कृती पण वेगाने बदलते आहे. कागदी पुस्तके आणि इ-बुक्स या दोन्हीचे समर्थक अगदी राजकीय पक्षांसारखे तावातावाने आपली बाजू मांडत असतात. हि इ-बुक्स आपल्या वाचन संस्कृतीवर काय परिणाम करतील हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मात्र इ-बुक्स विरुध्द हार्ड कॉपी पुस्तक अशा संघर्षाचे जे चित्र रंगवले जाते ते निरर्थक आहे. लेखकांच्या दृष्टीने पहिले तर इ-बुक्सचे वितरण आणिविक्री करणे फार सोपे आहे. या गोष्टींचा खर्च नसल्याने त्यांची किंमत पण कागदी पुस्तकांपेक्षा कमी असते. एका किंडल इ-रीडरमध्ये अशे शेकडो इ-बुक्स सहज रहातात त्यामुळे “इजी टू केरी” हा इ-बुक्सचा एक मोठा फायदा आहे. दुसर्या बाजूने हार्ड कॉपी पुस्तकाची पानं उलटण्याचा आनंद, नव्या पुस्तकाचा वास, मुखपृष्ठाच्या आणि इतर पानांच्या डिजाईनमधील बारकावे याची सर इ-बुक्स ला कधीही येणे शक्य नाही. असो असल्या घासून गुळगुळीत झालेल्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी हा लेख नाही. हार्ड कॉपी जरूर वाचावी. इ बुक्स येऊनही आजच्या तरुणाईतील हार्ड कॉपी पुस्तकांची क्रेझ कमी झालेली नाही उलट नानावि पुस्तके येत आहेत आणि लोकप्रिय होत आहेत. महत्वाचे

महामाया

रात्रीचे बारा वाजले होते. शक्य तितका कमी आवाज करत मी आपल्या घराचं दार उघडलं आणि चोरासारखा दबक्या पावलांनी आत शिरलो; इकडे तिकडे न बघता तडक आपल्या खोलीत धूम ठोकली आणि दार लावून घेतलं. समोरच्या आरशात दिसणारा स्वतःचा अवतार मला पाहवत नव्हता. केस विस्कटलेले, डोळे तणावानं लाल झालेले, चेहरा भीती आणि चिंतेनं पांढराफटक पडलेला. “ या महामायेच्या आ...” मी एक जोरदार शिवी हासडली. त्या बिलंदर मुलीच्या भूलथापांना बळी पडल्यामुळे माझ्यावर हि परिस्थिती ओढवली होती. जिच्यामुळे हि परिस्थिती निर्माण झाली होती, ती मुलगी मात्र माझ्या घरापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या अलिशान बंगल्यात शांतपणे डुलक्या घेत होती. ज्युलिअन असांज आणि एडवर्ड स्नोडननं जशी सीआयए डायरेक्टरची झोप उडवली होती, अगदी तशीच गंभीर डोकेदुखी या मुलीच्या कारवाया माझ्यासाठी निर्माण करतात. तिच्या भानगडी निस्तरून निस्तरून संशयास्पद प्रकरणं दडपण्यात मी आता चांगला वस्ताद झालो आहे. पण यावेळची भानगड मात्र वेगळी होती. माझ्या पदरात थोडे थोडके नव्हे तर चाळीस हजार रुपये पडले होते. ते कसे आले हे जर माझ्या पापभिरू पालकांना कळलं असतं तर त्यांनी मला सोलून क

सिंड्रेला

Image
समुद्राच्या लाटा तिच्या नाजूक पावलांशी लडिवाळपणे घोटाळत होत्या. गोरे गोरे गाल उन्हानं गुलाबागत लाल झलेले, चेहरा आनंदानं फुललेला, पाणीदार घारे डोळे कुठेतरी शून्यात हरवलेले, अशी सुंदर, सुबक मूर्तीसारखी किनाऱ्यावर उभी असलेली ती मुलगी अचानक गुणगुणायला लागली. “वाळूच्या कणात अन तरुणांच्या कानात भरलंय वेड्यागत वारं. पण सागराच्या अथांग निळ्याशार शांततेत... हेलो?” मोबाईल फोनच्या खणखणाटानं तिला दिवास्वप्नातून खाड्कन जमिनीवर आणलं “हो आलेच मी. तू डील क्लोज कर. मी पोचतेच.” तिच्या चेहऱ्यावरचा आनंद क्षणात लुप्त झाला “चाललीस का सोडून?” मी विचारलं “ “हो. गेलं पाहिजे मला.” “तुला माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय.” माझा चढलेला आवाज ऐकून ती केवळ मंद हसली आणि प्रत्युत्तरादाखल एक अवाक्षरही न बोलता तोंड वळवून चालायला लागली. “अगं, जाता जाता ती कवितेची शेवटची ओळ तरी पूर्ण कर!” “ ...पण सागराच्या अथांग निळ्याशार शांततेत    लपलंय वादळ खरं.” जाता जाता सुंदर शब्दांची उधळण करत ढगांच्या आडून हळूच काही क्षणापुरतं हसणाऱ्या ताऱ्याप्रमाणे ती पुन्हा अदृश्य झाली. तिचं हे कायम असंच असतं. या सुंदरीचं लाव