Posts

Showing posts from February, 2018

जगण्याचा वेग कमी करणे गरजेचे :कार्ल होनोरे

Image
धकाधकीचे रुटीन नाकारून शांत जीवनाचा आग्रह धरणाऱ्या ‘स्लो मुव्हमेंट विषयी याआधी या सदरात चर्चा झाली आहे. ”कार्ल होनोरे” लिखित “इन प्रेझ ऑफ स्लोनेस” या पुस्तकाचा संदर्भ त्या लेखात दिला होता. या चळवळीचे आजचे स्वरूप व भारत याविषयी इ-मेल द्वारे कार्ल होनोरे यांची एक छोटीशी मुलाखत मी ‘द गोवन’ तर्फे काही दिवसापूर्वी घेतली. ध्यानधारणा, योग, आयुर्वेद हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ खरे तर संतुलित जीवनाची गुरुकिल्ली आहेत आणि ते आपण सोडता कामा नये मत श्री होनोरे यांनी मुलाखतीदरम्यान मांडले. आपण ‘स्लो डाऊन’ होणे गरजेचे आहे असे तुम्हाला कधी व का वाटले?  मी आपल्या मुलाला रात्री गोष्टी वाचून दाखवत असे. मला वेळ कमी असल्याने काही ओळी, काही परिच्छेद किंवा काही पाने गाळून मी लवकरात लवकर गोष्टी संपवण्याचा प्रयत्न करायचो. साहजिकच  याचा माझ्या मुलाला खूप राग येई, त्यामुळे मग मलाही त्याचा राग येई. अशातच एक दिवस मला “वन-मिनिट बेडटाईम स्टोरी” अर्थात कोणतीही परीकथा एका मिनिटात मुलांना ऐकवण्याची सोय करणाऱ्या कलेक्शनची जाहिरात दिसली आणि वाटले व्वा! हे बरेच झाले. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात विचार आला कि

चांगल्या संधी कुठे आहेत?: एक उदाहरण

Image
काही दिवसांपूर्वी गोव्यातील युवक युवतींची सरकारी नोकरीसाठीची धडपड पाहण्यास मिळावी. केवळ ५४ च्या आसपास असलेल्या पदांसाठी हजारो अर्ज आले, नोकऱ्या नाहीत अशी ओरड झाली. तसे पहिले तर नोकरीच्या अनेक संधी आहेत, पण आपल्याला त्यासाठी लागणारे किमान कौशल्य आहे कि नाही हे आजच्या युवकांनी तपासून पाहण्याची गरज आहे. यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी वृत्तपत्र जगतातील परिस्थितीचे एक उदाहरण देतो.  वृत्तपत्रातील काही सहकारी सांगतात कि कोणत्याही विषयांवर लेख लिहून पाठवा असे आवाहन केले कि काम सोपे होण्याऐवजी त्यांना उलट ताप सहन करावा लागतो.  दुर्दैवाने हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक  चांगले लेख लिहून पाठवतात. काही लेखांची भाषा इतकी वाईट असते कि ती सुधारण्यात बराच वेळ वाया जातो. त्यातून मग जे लोक चांगले काम करू शकतात त्यांच्यावर ताण पडतो. एकीकडे दर्जेदार लेखक सगळीकडे प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतात. मग आपण लेख पाठवूनही तुम्ही छापत नाही अशी तक्रार करत लोक आम्हालाच धारेवर धरतात. म्हणजे विकिपीडिया किंवा तत्सम वेबसाईटवरून उचलून लेख पाठवणार तुम्ही, उगाचच "आमच्या ८० वर्षाच्या आजीचा दिनक्रम" वगैरे असले

शिक्षणाचा उपयोग काय?

आपली शिक्षण व्यवस्था बेकार अहे. शिक्षणाचा तसा खूप काही  उपयोग नाही.  इथे शिक्षित लोक  नोकऱ्या  मिळवण्यासाठी धडपडतात मग शिक्षणाला महत्व का द्यावे? हा प्रश्न प्रत्येकाला सतावत असतो. आपण शाळा कॉलेज आणि युनिवर्सिटीत जाऊन काय शिकलो ते पण आपल्याला कधी धड आठवत नाही मग आपण तिथे जाउन काय केलं ? असं पण आपण बरेचदा स्वतःला विचारत रहतो. पण नोकरी आणि पैसा या पलीकडे शिक्षणाचे काही छुपे फायदे आहेत ज्यामुळे अशिक्षित लोकांच्या तुलनेत शिक्षित लोकांची "क्वालिटी ऑफ लाइफ़" चांगली असते. अमेरिकन  पत्रकार स्टीवन डबनर यांनी २००८ ते २०१० च्या आर्थिक मंदीच्या काळात हि गोष्ट प्रकाशात आणली. पहिला प्रश्न  हा कि आपण कॉलेज आणि युनिवर्सिटीत जाउन नेमकं काय करतो? ती जाडजूड टेक्स्टबुकं आणि कंटाळवाणी लेक्चर्स काय उपयोगाची असतात? यावर डबनर म्हणतात कि आपण कॉलेजमध्ये बुकं शिकत नहि. उलट प्राध्यापक आणि अवतीभवतीचे विद्यार्थी आणि तेथील वातावरण आपल्याला पुस्तकात कधीच मिळणार नाहीत अशा काही गोष्टी शिकवतात. इथे डबनर साहेब त्यांच्या स्वतःच्या जीवनातील दोन उदाहरणे देतात. एकदा फिल्ममेकिंगच्या वर्गात त्यांनी प्राध्यापकांना