Posts

Showing posts from March, 2020

अमेरिकन गॉड्स: एक उदासीन सुंदरता

Image
नील गेमन यांचे “अमेरिकन गॉड्स ” हे पुस्तक वाचणे हा एक विचित्र अनुभव आहे. पुस्तकाची भाषा साधी पण सुंदर आहे. मात्र लेखकाने आपल्या भाषाकौश्ल्याने पुस्तकाल एक उदास झाक दिली आहे जी पहिल्या पानापासून आपल्याला जाणवायला लागते. कथानकही काहीसे विचित्र, पण इंटरेस्टिंग वाटते. शॅडो नामक कथानायक तुरुंगातून सुटतो तिथून कथानकाची सुरुवात होते. त्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या शॅडोला “वेडनस्डे” नामक एक रहस्यमय मनुष्य आपला बॉडीगार्ड म्हणून नोकरी देऊ करतो. मात्र काही वेळाने सर्व काही दिसते तसे नाही असे शेडोच्या लक्षात येते. हा “वेडनस्डे” म्हणजे प्रत्यक्षात नॉर्डिक पुराणातील देव “ओडिन” आहे. माणसांचा त्यांच्यावरील विश्वास कमी झाल्यामुळे आदिम काळापासून चालत आलेल्या देवतांची ताकद आता नव्या जमान्यात कमी होऊ लागलेली आहे. “मिस्टर इंटरनेट” “ मिस्टर टेलेव्हिजन” अशा नव्या गोष्टीना देवत्व प्राप्त झाले आहे.  हे नवे देव जुन्या देवताना नष्ट करायला उठले आहेत, आणि त्याविरोधात लढण्यासाठी ओडिन विविध प्राचीन देवतांची आपल्या पक्षात भारती करतो आहे. या कामी आपल्याला मदत करण्याचे काम देखील ओडिन शेडोवर सोपवतो. मग अमेरिकाभर

रिच डेड पुअर डेड: आर्थिक नियोजनाचा श्रीगणेशा

Image
रिच डेड पुअर डेड हे रोबर्ट कियोसाकी लिखित प्रसिध्द पुस्तक काही दिवसांपूर्वीच वाचनात आले. गरीब व श्रीमंत लोकांच्या आर्थिक नियोजनात कसा फरक असतो व विविध आर्थिक स्तरातील लोकांची पैशाकडे पाहण्याची दृष्टी कशी असते याचे विश्लेषण करत उत्तम आर्थिक नियोजनाद्वारे कसे श्रीमंत होता येईल त्याचा मार्ग दाखवणारे हे पुस्तक आहे. बालपणापासून खूप श्रीमंत होण्याची इच्छा असलेले लेखक वयाच्या नवव्या वर्षी आपल्या वडिलांना श्रीमंत होण्याचा उपाय विचारतात. त्यावर हा उपाय आपल्यापेक्षा माईक नामक बालमित्राच्या वडिलांना माहित असल्याचे सांगून लेखकाचे वडील त्याला त्यांच्याकडे पाठवतात. इथून व्यक्तिगत अनुभवाच्या सुंदर गोष्टी सांगत लेखक माईकच्या वडिलांकडून शिकलेल्या आर्थिक नियोजनाच्या युक्त्या उलगडत जातात. बेसिक बेलंस शीटचे अर्थातच उत्पन्न व खर्च असे दोन भाग असतात. पण त्याचबरोबर आपण ज्या वस्तू किंवा गोष्टी विकत घेतो त्यांची ‘एसेट’ व ‘लाएबिलिटी’ अशा दोन वर्गात वाटणी होते.  ‘एसेट’  म्हणजे अशा  गोष्टी त्यातून आपल्याला अर्थप्राप्ती होईल (जसे कि शेअर, म्युचुअल फंड, बॉंडस,  जमीन, इत्यादी) ‘लाएबिलिटी’ म्हणजे अशा वस्तू कि