Posts

Showing posts from January, 2018

ट्विटरची दुसरी बाजू

Image
सोशल मीडिया म्हणजे वेळ फुकट घालवण्याचे उद्योग असा बऱ्याच जणांचा समज असतो. ट्विटर आणि फेसबुकवर आपण कुठे गेलो, काय खाल्लं वगैरे अशी माहिती शेअर करण्यापलीकडेही बरंच काही करता येतं. मी स्वतः ट्विटरचा फॅन असल्याने प्रस्तुत लेखात ट्विटरचा चांगला उपयोग कसा करता येईल यावर काही सांगण्याचा इथे प्रयत्न करतो. ट्विटरवर एक ट्वीट केवळ १५० अक्षरात आटपावा लागतो (आता हि मर्यादा दुप्पट झाली आहे.) पण तितक्यातच लोक लघुकथा सुध्दा लिहितात. इतकंच नाही तर ट्विटरवर विविध विषयांना वाहिलेली चर्चासत्रे चालतात. आठवड्यातून एक दिवस आणि वेळ निश्चित करून जगभरातील लोक या चर्चासत्रात भाग घेतात. या चर्चना “ट्वीट चाट” म्हणतात आणि त्या त्या ट्वीट चाटचे ठराविक “हॅश टॅग” असतात ज्याद्वारे आपले ट्वीट त्या चाटरूममधील सर्व लोकांकडे पोचतात. उदाहरणार्थ #edchat हे शिक्षणविषयक चर्चासत्र दर मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री ९:३० ते १०:३० पर्यंत चालतं. यात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी शैक्षणिक सुधारणांवर चर्चा करतात. याविषयी तज्ञांचे लेख शेअर करतात तसेच जर तुम्हाला वाचनात रस असेल तर #amreading या हॅश टॅग वर तुम्ही नवनवीन

दुष्मंत चक्रा

Image
आपण तारुण्यात केलेल्या काही चुका पुढे आयुष्याभर आपल्याला छळत राहतात. अशाच एका मोठ्या चुकीची किंमत आज हे पुस्तक लिहिताना मी चुकवतो आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात चांगले वर्षभर काढूनही या शहराविषयी मी फार काही लिहू शकत नाही. कारण माझा बहुतांश वेळ मेक्स म्युलर भवन मध्ये जर्मन भाषा आणि संस्कृतीत गटांगळ्या खाण्यात जायचा. बाकरवडी, ठेचा, मिसळ अशा झणझणीत मराठी पदार्थांनी भरलेल्या ताटात हळूच लपून बसलेल्या विदेशी चॉकलेटसारखं छोटसं टुमदार ‘एम एम बी’ अस्सल देशी वळणाच्या पुण्यात जर्मन भाषा घोळवू पाहतं आहे. शिकणे आणि शिक्षण याविषयी शाळा नामक भयानक संस्थेने माझ्या मनात जे काही गैरसमज निर्माण करून ठेवले होते ते सर्व  ‘एम एम बी’ ने दूर केले. भाषा शिकणे म्हणजे केवळ निरस व्याकरण व  जाडजूड शब्दकोष नसून तो देश ती संस्कृती यामध्ये बुडून जाणे होय, हे येथील पहिले सूत्र. म्हणूनच कि काय,  ‘एम एम बी’त शिरलं की सर्वप्रथ लॉबीच्या एका कोपऱ्यात सतत  जर्मन DW चानेल दाखवणाऱ्या  टीव्हीचा आवाज कानावर पडायचा. संस्थेच्या मागे असलेल्या छोट्याशा परसात जर्मनांचा लोकप्रिय खेळ ‘टिशफुसबाल’ खुण