ट्विटरची दुसरी बाजू

सोशल मीडिया म्हणजे वेळ फुकट घालवण्याचे उद्योग असा बऱ्याच जणांचा समज असतो. ट्विटर आणि फेसबुकवर आपण कुठे गेलो, काय खाल्लं वगैरे अशी माहिती शेअर करण्यापलीकडेही बरंच काही करता येतं. मी स्वतः ट्विटरचा फॅन असल्याने प्रस्तुत लेखात ट्विटरचा चांगला उपयोग कसा करता येईल यावर काही सांगण्याचा इथे प्रयत्न करतो.

ट्विटरवर एक ट्वीट केवळ १५० अक्षरात आटपावा लागतो (आता हि मर्यादा दुप्पट झाली आहे.) पण तितक्यातच लोक लघुकथा सुध्दा लिहितात. इतकंच नाही तर ट्विटरवर विविध विषयांना वाहिलेली चर्चासत्रे चालतात. आठवड्यातून एक दिवस आणि वेळ निश्चित करून जगभरातील लोक या चर्चासत्रात भाग घेतात. या चर्चना “ट्वीट चाट” म्हणतात आणि त्या त्या ट्वीट चाटचे ठराविक “हॅश टॅग” असतात ज्याद्वारे आपले ट्वीट त्या चाटरूममधील सर्व लोकांकडे पोचतात.

उदाहरणार्थ #edchat हे शिक्षणविषयक चर्चासत्र दर मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री ९:३० ते १०:३० पर्यंत चालतं. यात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी शैक्षणिक सुधारणांवर चर्चा करतात. याविषयी तज्ञांचे लेख शेअर करतात



तसेच जर तुम्हाला वाचनात रस असेल तर #amreading या हॅश टॅग वर तुम्ही नवनवीन पुस्तकांवर चर्चा करणऱ्या लोकांना भेटू शकता. यावर चर्चेची ठराविक वेळ नाही. इथे गप्पा संथपणे पुढे सरकत असतात.



ट्विटरवर फक्त चर्चाच नाही तर लघुकथा आणि कादंबऱ्याहि उलगडत असतात.  पुलित्झर प्राईझ विनर लेखिका जेनिफर एगन यांनी नुकताच एक अनोखा प्रयोग केला. त्यांनी चक्क ट्विटरवर एक हेरकथा प्रसिध्द केली.  टीव्हीवर जशी सीरिअल लागते तशी दर मंगळवारी रात्री ९ ते १० ट्विटरवर त्यांची कथा पुढे सरके. “द ब्लॅक बॉक्स” नामक हि कथा लिहिली जात असतानाच “लाइव्ह” वाचायची संधी वाचकांना मिळे. यामुळे पुढे अशा अनेक कथा निर्माण होऊन “ट्विटर फिक्शन” नावाचा नवीन साहित्य प्रकारच तयार झाला.


असे अनेक खजिने सोशल मीडियाच्या या मायाजालात दडलेले आहेत. अर्थशून्य पोस्ट करण्यापेक्षा  विधायक गोष्टी शोधण्यात रस असलेल्यांना ते चटकन सापडतात. त्याचप्रमाणे सोशल मीडिया ची हि दुनिया जितकी चांगली तितकी वाईट पण आहे. आपल्या एखाद्या चुकीच्या पोस्टमुले लोक जर दुखावले गेले तर ट्विटरवरील लोकांचे लोंढे आपले आयुष्य उश्वस्त करून टाकतात. असे भोग नशिबी आलेल्या काही लोकांच्या कथा पुढे कधीतरी.

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी