Posts

Showing posts from November, 2017

तीन अवलियांची कथा

पुण्यातील मेक्स म्युलर भवन मध्ये जर्मन भाषा शिकत असताना मला असे काही अवलिये भेटले कि स्वतःच्या सुशेगाद, मिळमिळीत जगण्याची एकीकडे शरम वाटू लागली त्याचप्रमाणे “हे जग फार निष्ठुर असते, पावला पावलाला तडजोड करावी लागते" वगैरे असले सिद्धांत कुठून जन्माला येतात तेही लक्षात आले. या साऱ्या गोष्टींचा साक्षात्कार मला होण्याचे कारण म्हणजे तीन पुणेरी तरुण. इथे आपण त्यांची नावे ठेऊ “चित्रकार,” “मेकानिक” आणि “इंजिनियर”. तिघेही उच्च मध्यमवर्गीय लोक. पण ध्येयासक्ती नावाचा प्रकार काय असतो, आणि ती नसली कि काय होते हे या त्रयीच्या आयुष्याकडे पाहून समजावे. तिघांचे वय वर्षे तेवीस. पण चित्रकार हा यातील सर्वात उत्साही आणि अनुभवसमृद्ध प्राणी. एक साधी स्कूटर घेऊन क्लासला यायचा. शाधासा बिनबाह्यांचा शर्ट, पाठीला एक सेक ज्याच्यात एक स्केचबुक, एक पेन आणि एक पेन्सिल. कधी कधी तर खिशात पाकीट देखील नसे. पण हा त्याचा अवतार फसवा होता. क्लासमध्ये एकटाच कोपऱ्यात चित्र काढत बसणार्यापैकी हा मनुष्य नव्हता. मिश्कील आणि खट्याळ स्वभावाचा हा माणूस पटकन काहीतरी विनोदी बोलून क्लासमध्ये धमाल उडवून देत असे. त्याला प्रवासाची ज