Posts

Showing posts from October, 2017

त्रिशंकू

कॉलेजमधून बाहेर पडलेल्या आणि नवीन नोकरीला लागलेल्या प्रत्येक तरुणासाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला पुढची वरच्या पगाराची नोकरी शोधण्याची पाळी न येता त्या नोकरीची ऑफर येणे. तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मान आणि जास्त पैसे मिळणार असतात. पहिली नोकरी आता रेझ्युमेवर एक ‘एक्स्पीरियंस’ बनतो, आणि तुम्ही ऑफिसमध्ये ‘सिनियर’ बनण्याच्या दिशेने पाहिलं पाउल टाकता. मात्र इथे तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नसतो, पुढे जबाबदाऱ्या वाढणार असतात आणि असंख्य तडजोडी कराव्या लागणार असतात या गोष्टी तुम्ही वाढत्या पगार आणि स्टेटसच्या मोहापायी विसरून जाता. नेमकी हीच चूक मी पण केली. अंतरराष्ट्रीय राजकारणात मला असलेली रुची पाहून बोधीसत्वांनी स्वतः “अकलेचे तारे” या ते नव्यानेच संपादक बनलेल्या मराठी दैनिकात जागतिक बातम्या देणाऱ्या विभागाचा उपसंपादक म्हणून नोकरी ऑफर केली, आणि मोठ्या पगाराला भुलून मी ती तत्काळ स्वीकारली. इंग्लिश चेनल सोडून आता मी मराठीत शिरलो, आणि अक्षरशः अंधारात चाचपडू लागलो. ग्रामीण “भारत” आणि शहरी, “इंडिया” अशी एक मोठी दरी आपल्या देशात असल्याचं प्रसारमाध्यमे सांगत असतात. त्या दरीच्या मधोम

बोधिसत्व

Image
“अनलर्निंग हा नवनिर्मितीचा पाया आहे” हे शब्द माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहेत. कोणत्याही नव्या समस्येला सामोरे जाताना अथवा नवीन काही निर्माण करताना यापूर्वी आपण जे काही शिकलो, आपल्या परिस्थितीबद्दल ज्या काही अपेक्षा आणि आडाखे आहेत ते सारे विसरून नव्या दृष्टीने प्रत्येक प्रश्नाकडे बघता यायला पाहिजे. ही गोष्ट मी आमचा महान न्यूज चेनल मध्ये माझ्या दोन वर्षाच्या कार्यकाळात शिकलो. हे नवनिर्मितीचं तत्व केवळ दोन टप्प्यांच्या सोप्या प्रोसेस मध्ये उलगडतं. पहिला, एखाद्या न्यूज किंवा फिल्म स्टोरीच्या कंटेंटबद्दल लोकांच्या काय अपेक्षा असतील त्यांची एक यादी बनवायची. आणि दुसरा, त्या अपेक्षांच्या पलीकडचे काहीतरी निर्माण करायचे. माझा बॉस, आमच्या महान न्यूज चानेलचा संपादकांनी या गोष्टी मला सांगितल्या. आज तोच विचार माझ्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. आपण कुठे चाललो आहोत याचा त्यांना उत्तम अंदाज होता. आजच्या जगात प्रेक्षक अधिक सजग झाला आहे, आणि निव्वळ करमणूकीपेक्षा ‘इन्फोटेन्मेंट’ हीच माहितीच्या युगात प्रेक्षकवर्ग धरून ठेवण्याची गुरुकिल्ली आहे असं त्यांचं मत होतं. त्याचबरोबर आपल्याला मिळणाऱ्या