Posts

Showing posts from May, 2018

गरज सकारात्मक मीडियाची

Image
आजचे जग म्हटले कि तुमच्या  डोळ्यासमोर कोणते चित्र उभे रहाते? भ्रष्टाचार, गुन्हेगारी, हेच आठवते का? जर मी तुम्हाला सांगितले कि आताचे जग खरे तर खूप सुंदर आहे आणि तुमच्यासमोर मीडियाद्वारे जाणूनबुजून वाईट चित्र उभे केले जात आहे तर? हे सत्य अहे. जागतिक स्तरावर गरीब श्रीमान्तामधील दरी कमी होत आहे. साक्षरता वाढते आहे, संशोधनातील प्रगतीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये मरणाऱ्या लोकांची संख्या निम्याहून घटली अहे. मेडिकल रिसर्चमुळे मृत्यू कमी होत आहेत. हे माझे स्वतःचे दावे नाहीत स्वीडिश मेडिकल डॉक्टर आणि स्टोकहोम मधील युनिवर्सिटी प्राध्यापक हान्स रोसलिंग (Hans Rosling ) यांनी या गोष्टी आकडेवारी सहित सिद्ध केलेल्या अहेत. यावर सुप्रसिध्द "टेड" कोन्फ़रन्स मध्ये बोलताना ते म्हणाले कि माध्यमे सेन्सेशनल बातम्यांच्या पाठी लागत आपल्यासमोर जगाचे वाईट चित्र उभे करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. आपण सकाळी पेपर उघडताच पहिल्या पानावर गैरप्रकार आणि दुर्घटनांच्या बातम्या आपले स्वागत करतात. टीव्हीवर तर कर्णकर्कश  संगीतासहित  दुर्घटनांची लाइव्ह कोमेंट्री चालू असते. अशा गोष