गरज सकारात्मक मीडियाची

आजचे जग म्हटले कि तुमच्या  डोळ्यासमोर कोणते चित्र उभे रहाते? भ्रष्टाचार, गुन्हेगारी, हेच आठवते का? जर मी तुम्हाला सांगितले कि आताचे जग खरे तर खूप सुंदर आहे आणि तुमच्यासमोर मीडियाद्वारे जाणूनबुजून वाईट चित्र उभे केले जात आहे तर?

हे सत्य अहे. जागतिक स्तरावर गरीब श्रीमान्तामधील दरी कमी होत आहे. साक्षरता वाढते आहे, संशोधनातील प्रगतीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये मरणाऱ्या लोकांची संख्या निम्याहून घटली अहे. मेडिकल रिसर्चमुळे मृत्यू कमी होत आहेत. हे माझे स्वतःचे दावे नाहीत स्वीडिश मेडिकल डॉक्टर आणि स्टोकहोम मधील युनिवर्सिटी प्राध्यापक हान्स रोसलिंग (Hans Rosling ) यांनी या गोष्टी आकडेवारी सहित सिद्ध केलेल्या अहेत. यावर सुप्रसिध्द "टेड" कोन्फ़रन्स मध्ये बोलताना ते म्हणाले कि माध्यमे सेन्सेशनल बातम्यांच्या पाठी लागत आपल्यासमोर जगाचे वाईट चित्र उभे करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. आपण सकाळी पेपर उघडताच पहिल्या पानावर गैरप्रकार आणि दुर्घटनांच्या बातम्या आपले स्वागत करतात. टीव्हीवर तर कर्णकर्कश  संगीतासहित  दुर्घटनांची लाइव्ह कोमेंट्री चालू असते. अशा गोष्टी कानावर पडत राहिल्यामुळे मग आपले जीवन सुरळीत असूनही जग असुरक्षित बनत चालल्याची भावना आपल्या मनात घर करून राहते.

आपल्या माध्यमांना सुधारण्याची गरज आहे. मिडीयाने वाईट गोष्टींवर बोट ठेवावे हे मला मान्य आहे पण दिवसरात्र केवळ वाईट गोष्टींचेच तुणतुणे वाजव्ण्याऐवजी हि माध्यमे चांगल्या-वाईटाचा योग्य समतोल का नाही राखत? बरे, आपण प्रेक्षक असल्यामुळे चांगल्या कंटेंटची मागणी करणं हि आपली पण जबाबदारी अहे.
इन्टरनेट आणि सोशल मिडीयाचा हुशारीने वापर केला तर आपण या नकारात्मकतेच्या चक्रातून बाहेर पडू शकतो. आपल्या देशाविषयी कायम सकारात्मक न्यूज देणारी एक सुंदर वेबसाईट आहे "द बेटर इंडिया" (http://www.thebetterindia.com/) सरकारपासून सामान्यांपर्यंत देशभर कोण काय चांगले काम करत आहे हे आपल्याला हि साईट सांगते. त्याचप्रमाणे जर तुम्ही ट्विटर वर असाल तर देशोदेशीचे  भारतीय राजदूत आपल्या देशाबद्दल फार गौरवशाली गोष्टी ट्वीट  करत असतात. भारताचे ऑस्ट्रेलियातील राजदूत श्री नवदीप सूरी (@navdeepsuri) आणि संयुक्त राष्ट्र मुख्यालयातील भारतीय राजदूत सय्यद अक्बारुद्दिन (@AkbaruddinIndia)हे माझे विशेष आवडते अहेत.

राजकारण आणि समाजकारण चांगले असावे म्हणून त्यातील चुका प्रकाशात आणतानाच आपल्या समाजाचा आत्मसन्मान, उत्साह टिकवा म्हणून त्याला आपल्या देशाचा अभिमान वाटावा अशा गोष्टी पण माध्यमांनी सतत सांगत राहिल्या पाहिजेत. वाईट बातम्यांनी समाजात फक्त कडवटपणा आणि भीती पसरते. हे माहीत असून सुद्धा आपली माध्यमे अशी का वागतात हा एक प्रश्न आहे.

बाकी वर्तमानपत्रांनी आतील पानात ढकललेल्या आपल्या देशाच्या काही मोठ्या उपलब्धी विषयी  श्री अक्बारुद्दिन यांनी ट्विटर वर शेअर केलेला खालील व्हिडिओ जरूर पहा.



Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी