Posts

Showing posts from September, 2017

बॉसिण

“जाऊ द्या हो. लहान आहे तो अजून" हा संवाद कुठल्या घरातला नसून एका ऑफिसात आहे, आणि खडीसाखरेसारख्या स्पष्ट, खणखणीत पण गोड आवाजातले हे शब्द आहेत एका बॉसिणीचे. तो लहान मुलगा - वय वर्षे तीस, कामाचा अनुभव सात वर्षे- असा मी. कामात काहीतरी चूक झाल्यावर भडकलेले पेपरच्या डिजाईन टीमचे हेड क्षणभर अवाक झाले. संपादक वगैरे सारखा कितीही मोठा हुद्दा  असला तरी “त्या मेडम” सारखी माणसांमध्ये उगाचच दुरावा निर्माण करणारी विशेषणे मी तिला कधीही लावू शकलो नाही. ती कायम “ती बोसिण” होती आणि आहे. पत्रकारितेतील माझी आतापर्यंतची सात वर्षे केवळ दोनच बॉसेसच्या हाताखाली सरली, आणि ते दोघेही अत्यंत प्रेमळ आहेत. त्यातील दुसरी आणि सध्याची हि बॉसिण. गव्हाळ वर्णाची, मिश्कील स्वभावाची, हसली कि किंचित गुलाबी छटा असलेल्या गालांना नाजूक खळ्या पडणारी बॉसिण कामात चूक झाली कि ओरड्ण्याऐवजी  “सोडून दे रे, उगाच जिवाला त्रास करून घेऊ नकोस” म्हणत समजूत काढते. तेव्हा मग केवळ तिच्या प्रेमापोटी कामाचा दर्जा उंचावतो. आरडाओरडा करून प्रश्न सुटत नसतात. उलट माणसं बुजतात आणि जास्त चुका करतात. हि आणि अशा अनेक गोष्टी तिनं मला शिकवल्या. चूक झ

आमचे इथेच पंढरपूर!

Image
सोशल मीडियाद्वारे असो व प्रत्यक्ष भेटून व बोलून असो, माणसे जोडणे, नेटवर्क निर्माण करणे खूप महत्वाचे आहे असे माझे मत आहे. पण आज समृद्ध जीवन म्हणजे नेमके काय याच्या बदलत्या कल्पनांमुळे माणसे जोडणे सहज सोपे असले तरी ती टिकवून ठेवणे कठीण होत चालले आहे. आज लोक करियरपाठी पळत गोव्याहून दिल्ली आणि तिथुन पुढे वॉशिंग्टनला निघून जातात पण या नादात जुने शाळूसोबती, नातेवाईक, आई-वडील अशी माणसे आणि त्यांचा आधार तुटत जातो. असे पैशापाठी पाळण्यापेक्षा आपण निवांत एका जागी राहावे असे मला वाटते. मग आपल्याला एक दिवस अचानक शोध लागतो कि शाळेत आपल्या शेजारी बसणारा, आपल्या डब्यातले चोरून खाणारा मित्र दशकभरानंतर आज पोलीस इन्स्पेक्टर झाला आहे, आपल्याला कायम नोट्स उसने देणारी पुढल्या बाकावरील सुंदरी बँकेत जुन्या ओळखीवर पटकन आपली कामे करते आहे, आणि आपण रोज ऑफिसात जायला जी बस पकडतो त्याचा चालक दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या कॉलेजमध्ये शेवटच्या बाकावर बसून सर्वांची करमणूक करणारा त्या वेळचा ’कूल ड्यूड’ आहे. पैसा दिसेल तिथे उठून जाण्याने अशी संपर्कांची शक्तिशाली  ’नेटवर्क' आपण निर्माण करू शकत नाही. आता कोणी म्हणेल