Posts

Showing posts from July, 2018

चकचकीत 'इंग्लिश' भारतीयत्व

Image
आपल्यापैकी प्रत्येकाचे एक सांकृतिक विश्व असते. आपल्या आवडीनिवडी, समजुती, विचार, आपले आवडते सिनेमे, संगीत, पुस्तके, ट्विटर व फेसबुक वर आपण फॉलो करत असलेली माणसे   या गोष्टी त्यात येतात. आणि आज बऱ्याच तरुणांचे सांकृतिक विश्व हे विदेशी असते. तुमचा आवडता अभिनेता/अभिनेत्री कोणती असे विचारल्यास बरेच लोक विदेशी अभिनेत्यांची, चित्रपटांची  नवे फेकतात. आवडते पुस्तक विचारल्यास इंग्लिश पुस्तकाचे नाव सांगणे ‘कूल’ समजले जाते. या चुका मी स्वतः सुद्धा केल्या आहेत. तसे पहिले तर वाचनाच्या दृष्टीने माझा पिंड इंग्लिश आहे. लहानपणी फेमस फाईव, हार्डी बॉयज या पुस्तकांमुळे आणि कार्टून नेटवर्क नामक चानेलमुळे अम्झ्या पिढीवर पाश्चात्य विचारसरणीचा खोल प्रभाव पडला. पुढे कॉलेज व युनिवर्सिटीत भारतीय लेखकांनी लिहिलेली उत्तमोत्तम पुस्तके वाचनात आली, राज्यशास्त्र शिकताना विविध राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे व माजी आय ए एस अधिकाऱ्यांनी लिहिलेली पुस्तके वाचनात आली, काही अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळाली  तेव्हा कुठे आपला देश १९९० च्या दशकानंतर कसा बदलत गेला व आपण कसे बलाढ्य आहोत हे माझ्या लक्षात आले आणि मला

घरवापसी

Image
गाडी आश्रमाच्या दाराशी आलेली पाहताच त्याच्या चेहेर्यावर मंद स्मित उमटले. “गुड मोर्निंग स्वामीजी...सर” त्याला आता कसे संबोधावे या प्रश्नाने ड्रायव्हर गोंधळून गेला. तो एक शब्दही न बोलता गाडीत बसला आणि  गाडीने विमानतळाचा रस्ता धरला. इतक्या वर्षानंतर आपल्या मर्सेडीजचा मऊ सीट त्याला अधिकच उबदार वाटत होता.  गुरुदेव स्वामी अदभुतानंदांना भेटण्याच्या काही महिने आधीच त्याने मोठ्या उमेदीने ही गाडी घेतली होती. बाकी या स्वामींची वाणी मोठी रसाळ. वैराग्य आणि जनसेवा शिकविणाऱ्या स्वामींच्या शब्दांचा त्याच्यावर असा काही परिणाम झाला कि त्याने त्यांचे शिष्यत्व पत्करून संन्यास घेतला होता आणि घरदार, परिवार, अगदी कॉलेजमधील मित्रांसोबत वयाच्या विसाव्या वर्षी सुरु केलेल्या आपल्या “बूमरेंग इन्वेस्टमेंटस” या कंपनीवरही पाणी सोडले होते. अर्थशास्त्रातील जबरदस्त प्राविण्यामुळे त्याने अल्पावधीतच फायनान्सचा बादशहा म्हणून नाव कमावले होते व कंपनी चांगली भरभराटीला आणली होती. हि कंपनी सुरु केल्यानंतर पाच वर्षांनी तो गुरुदेवांच्या, आणि त्यांच्या “अदभुत संघ” या संघटनेच्या संपर्कात आला होता व त्यापुढील तीन वर्षात त्य