चकचकीत 'इंग्लिश' भारतीयत्व


आपल्यापैकी प्रत्येकाचे एक सांकृतिक विश्व असते. आपल्या आवडीनिवडी, समजुती, विचार, आपले आवडते सिनेमे, संगीत, पुस्तके, ट्विटर व फेसबुक वर आपण फॉलो करत असलेली माणसे   या गोष्टी त्यात येतात. आणि आज बऱ्याच तरुणांचे सांकृतिक विश्व हे विदेशी असते. तुमचा आवडता अभिनेता/अभिनेत्री कोणती असे विचारल्यास बरेच लोक विदेशी अभिनेत्यांची, चित्रपटांची  नवे फेकतात. आवडते पुस्तक विचारल्यास इंग्लिश पुस्तकाचे नाव सांगणे ‘कूल’ समजले जाते.

या चुका मी स्वतः सुद्धा केल्या आहेत. तसे पहिले तर वाचनाच्या दृष्टीने माझा पिंड इंग्लिश आहे. लहानपणी फेमस फाईव, हार्डी बॉयज या पुस्तकांमुळे आणि कार्टून नेटवर्क नामक चानेलमुळे अम्झ्या पिढीवर पाश्चात्य विचारसरणीचा खोल प्रभाव पडला. पुढे कॉलेज व युनिवर्सिटीत भारतीय लेखकांनी लिहिलेली उत्तमोत्तम पुस्तके वाचनात आली, राज्यशास्त्र शिकताना विविध राजकीय नेत्यांची आत्मचरित्रे व माजी आय ए एस अधिकाऱ्यांनी लिहिलेली पुस्तके वाचनात आली, काही अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळाली  तेव्हा कुठे आपला देश १९९० च्या दशकानंतर कसा बदलत गेला व आपण कसे बलाढ्य आहोत हे माझ्या लक्षात आले आणि मला स्वदेशाचा अभिमान वाटू लागला. दर्जेदार इंग्लिशमध्ये लिहिलेल्या या पुस्तकांनी माझ्या मूळ इंग्लिश पणाला धक्का न लावता एक भारतीय सांस्कृतिक विश्व निर्माण करून दिले.

मला आपल्या मुलांना अस्सल देशी सांस्कृतिक ठेवा द्यायचा आहे -मराठी सहित सुंदर भारतीय लेखकांच्या इंग्लिश पुस्तकांचा ठेवा. आमच्या लहानपणी चांगली भारतीय इंग्लिश पुस्तके माझ्या तरी पाहण्यात अली नाहीत पण आता अमिश त्रिपाठी लिखित शिवा ट्रिलॉजी सारखी फेंटासि, अश्विन संघी लिखित चाणक्य चांट सारखी थ्रिलर, मैनक धर यांनी लिहिलेली 'लाईन ऑफ कंट्रोल', 'विमान' यासारखी एक्शन नॉव्हेल्स उपलब्ध आहेत. या कादंबर्यांची भाषा इंग्रजी असली तरी पोत अस्सल भारतीय आहे.

आपल्या मुलांनी श्रीमान योगी, महानायक, युगंधर वगैरे हे वाचावेच, पण त्यांना त्यांच्या काही इंग्लिश आवडीनिवडी असतील, इंग्लिश बोलत आपल्या मित्रमैत्रिणींवर छाप पाडावी असे त्यांनाही वाटत असेल ती त्यांची उर्मी न दाबता दर्जेदार भारतीय पुस्तके त्यांना द्यावीत. बाहेरची पुस्तके वाचायला माझा विरोध नाही पण ते करत असताना देखील आपण आपल्या भारतीय पिंडाशी प्रामाणिक राहावे. केवळ देहाने भारतात राहून आपल्या सर्व आवडीनिवडी पाश्चात्य असल्या तर या देशाच्या ऐतिहासिक वर्षाशी आणि समृद्ध संस्कृतीशी ती प्रतारणा ठरेल. तुम्हाला इंग्लिश अधिक कूल वाटते ना, ठीक आहे. आपण आपल्या कथा, कादंबऱ्या, नवा साज चढवून इंग्लिशमध्ये आणू. नवनवी साहसे करणारे भारतीय सुपरहिरो तयार करू.  काळाबरोबर बदलत असतानाच आपले भारतीयत्व आपल्याला जपले पाहिजे, ते नित्य नव्या रूपात पुढील पिढ्यांपुढे मांडले पाहिजे

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी