शिक्षणाचा उपयोग काय?

आपली शिक्षण व्यवस्था बेकार अहे. शिक्षणाचा तसा खूप काही  उपयोग नाही.  इथे शिक्षित लोक  नोकऱ्या  मिळवण्यासाठी धडपडतात मग शिक्षणाला महत्व का द्यावे? हा प्रश्न प्रत्येकाला सतावत असतो. आपण शाळा कॉलेज आणि युनिवर्सिटीत जाऊन काय शिकलो ते पण आपल्याला कधी धड आठवत नाही मग आपण तिथे जाउन काय केलं ? असं पण आपण बरेचदा स्वतःला विचारत रहतो. पण नोकरी आणि पैसा या पलीकडे शिक्षणाचे काही छुपे फायदे आहेत ज्यामुळे अशिक्षित लोकांच्या तुलनेत शिक्षित लोकांची "क्वालिटी ऑफ लाइफ़" चांगली असते. अमेरिकन  पत्रकार स्टीवन डबनर यांनी २००८ ते २०१० च्या आर्थिक मंदीच्या काळात हि गोष्ट प्रकाशात आणली.

पहिला प्रश्न  हा कि आपण कॉलेज आणि युनिवर्सिटीत जाउन नेमकं काय करतो? ती जाडजूड टेक्स्टबुकं आणि कंटाळवाणी लेक्चर्स काय उपयोगाची असतात?

यावर डबनर म्हणतात कि आपण कॉलेजमध्ये बुकं शिकत नहि. उलट प्राध्यापक आणि अवतीभवतीचे विद्यार्थी आणि तेथील वातावरण आपल्याला पुस्तकात कधीच मिळणार नाहीत अशा काही गोष्टी शिकवतात. इथे डबनर साहेब त्यांच्या स्वतःच्या जीवनातील दोन उदाहरणे देतात. एकदा फिल्ममेकिंगच्या वर्गात त्यांनी प्राध्यापकांना सरळ सांगितलं कि मी चांगली फिल्म बनवू शकणार नाही कारण माझ्याकडे चांगल्या दर्जाचे केमेरे आणि एडिटिंग यंत्रणा नाहीये. त्यावर प्राध्यापकांनी उत्तर दिलं की चागली फिल्म करायला दर्जेदार इक्विपमेंट नाही तर भन्नाट डोकं लागतं स्वतःच्या इक्विपमेंटला कधीही दोष देऊ नका. आपल्याकडे जे काही  आहे त्याचा उत्तम उपयोग कस करता येईल ते पहा.

डबनर पुढे म्हणतात कि त्या क्लासचा मूळ विषय काय होता ते आपल्या लक्षात नाही पण हा उपदेश आपल्याला जन्मभर उपयोगी पडला. असा त्या ज्ञानी लोकांच्या वागणुकीचा, विचारांचा प्रभाव आपल्याला घडवतो आणि  युनिवर्सिटीत प्राध्यापकांनी सहज बोलता बोलता दिलेल्या अशा छोट्या छोट्या टिप्स नकळत आपल्या जगयाची सूत्रं बनून जातात.

माझे राज्यशास्त्राचे प्राध्यापक श्री राहुल त्रिपाठी यांचं इंग्लिश खूप सुंदर होतं. ते बोलताना वाक्प्रचारांचा उपयोग खूप करत. मी राज्यशास्त्राच्या नोट्स कधीच लिहून घेतल्या नाहीत.  उलट मी त्यांच्या तोंडून येणारे वाक्प्रचार टिपत बसायचो. त्यामुळे पोलिटिकल सायन्सच्या वर्गात बसून माझी भाषा सुधरली. राज्यशास्त्र मात्र काहीच आठवत नाहि.

त्याचप्रमाणे अभ्यासकांनी सिद्ध केलं आहे कि  जेव्हा आपण एखादी परकीय भाषा शिकतो तेव्हा आपला मेंदू इन्फोर्मेशन वेगळ्या पद्धतीने प्रोसेस करू लागतो. त्यामुळे अल्झायमर रोगाचे म्हातारपणात होणारे आक्रमण पाच ते दहा वर्षे उशिरा होते किंवा अजिबात होत नाही. ते व्हा शाळेत परकीय भाषा शिकणे म्हणजे म्हातारपणासाठी अमुल्य पुंजी अहे.

कॉलेज ग्रेज्युएटस त्यांना मिळालेल्या एक्स्पोजरमुळे कलेचा आस्वाद अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतात त्याचप्रमाणे शिक्षित लोकांचे आर्थिक नियोजन अधिक चांगले असते  म्हातारपणातील पेन्शन, इंवेस्टमेंट, याविषयी ते अधिक सजग असतात. इतकेच नव्हे तर समाजात अधिक मान असल्यामुळे ते अशिक्षित किंवा अर्धशिक्षित लोकांपेक्षा अधिक आनंदी जीवन जगतात, आणि दीर्घकाळ अनंगी राहिल्याने त्यांचे आयुर्मानही जास्त असते. तेव्हा शिका. कान आणि डोळे उघडे ठेऊन शिका. शिक्षण खरोखर अमुल्य आहे. 

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी