नैराश्यावर बोलू काही...

प्रोफेशनल जीवनात येणारा स्ट्रेस आणि त्यामुळे जडणाऱ्या  शारिरीक व्याधींबद्दल आपण बरेच बोलतो व ऐकतो.  पण त्याचबरोबर जीवघेणी स्पर्धा आपल्या मानसिक आरोग्यावरही प्रचंड मोठा आघात करते. हृदयविकारानंतर जगात सर्वात कॉमन झालेला  आजार म्हणजे डिप्रेशन. डिप्रेशनवर एक सुंदर पुस्तक माझ्या वाचनात आले त्यावरच हा लेख आहे. मेट हेग (Matt Haig.) या ब्रिटीश लेखकाने त्यात आपले डिप्रेशनचे अनुभव आणि त्यावर मिळवलेल्या विजयाचा प्रवास मांडला अहे. पुस्तकाचे नाव आहे रिझन्स टू स्टे अलाइव्ह. (Reasons to Stay Alive)

मेट केवळ २४ वर्षाचा होता. तो आपल्या गर्लफ्रेंडसहित स्पेनमधील समुद्र्कीनार्यांसाठी साठी प्रसिद्ध असलेल्या इबिझा शहरात एका पॉश सी-फेसिंग विलामध्ये राहायचा आणि त्याचा जॉब होता इवेंट मेनेजर म्हणून  दर वीकेंडला पार्टी ओर्गनाइज कारणं . असं सर्व काही असताना त्याला डिप्रेशन आलं.
आता काही लोक म्हणतील की विदेशात होतात असले प्रकर. आपल्याकडे परिवार आणि मित्रांचा भक्कम सपोर्ट असतो माणसाला. इथे नसेल इतकं डिप्रेशन वगैरे.

चूक

असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) ने २०१५ साली प्रसिध्द केलेल्या एका सर्वेक्षणानुसार हाय-स्ट्रेस जोब करणाऱ्या कोरपोरेट जगतातील ४२% प्रोफेशनल्स डिप्रेशनचे शिकार होतात. (1) या सर्वेक्षणातील  ५५% लोक वीस ते तीस वर्षे वयोगटातील होते. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक तरुण प्रोफेशनल्सना नैराश्याने ग्रासले अहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या मार्च २०१५ मधील एका रिपोर्टनुसार दर दहा भारतीय लोकांमधील एक व्यक्ती या आजाराचा सामना करत असते म्हणजेच मेट हेगचे लेखन इथल्या तरुणानाही लागू होते.(2)

या पुस्तकात एका डिप्रेशनने ग्रासलेल्या माणसाची कथा आणि मानसशास्त्रातील  वैज्ञानिक संशोधनाचे अजब मिश्रण आहे आणि गम्मत म्हणजे हे सगळे विनोदी शैलीत सांगितले अहे.  लेखक आपल्याला भयाण दिवस, काळ्याकुट्ट रात्री आणि उदास विचारांची कथा सांगतो. त्यावर त्याने पुष्कळ औषधं  घेतली, पण ती काही असरच करीनात! मग शेवटी तो सरळ उठून जगातील सर्वात रोमांटिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेरिसला गेला आणि त्याच्या मनस्थितीत लगेच फरक पडला.

पण जर अशा साध्या गोष्टीनी इतका फरक पडतो तर औषधांचा इफेक्ट कसा नाही झाला असा प्रश्न उपस्थित करून तो यावर मानशास्त्र काय म्हणते त्याची माहिती देतो. मानसशास्त्रातील एका थिअरिनुसर आपल्या मेंदूत सेरोटोनीन नामक एका केमिकलच्या कमतरतेमुळे डिप्रेशन येते. यामुळे डिप्रेशनवरील काही औषधे हि सेरोटोनीनची पातळी वाढवण्यासाठी तयार केलेली असतात. या औषधांच्या गटाला  सिलेक्टीव सेरोटोनीन री-अपटेक इनहिबिटर  (Selective Serotonin Reuptake Inhibitors (SSRI) ) असे नाव अहे.

मात्र दुसरी थिअरि म्हणते कि आपल्या मेंदूच्या मध्यभागी असलेल्या "न्युक्लिअस अकुंबिनस" (nucleus accumbens) या छोट्याश्या भागात काही गडबड झाली तर डिप्रेशन येते. बहुतेक त्यामुळेच या SSRI औषधांचा काही पेशंटवर अजिबात परिणाम होत नाही असं मेट हेग सुचवतो.

तात्पर्य आपले मानसिक आरोग्य किती महत्वाचे आहे ते हे पुस्तक अधोरेखित करते. आपण व्यायाम करून जसे आपल्या शरीराकडे लक्ष देतो तसे आपल्या मनाकडे पण दिले पाहिजे. त्यासाठी योग आणि ध्यानधारणा खूप उपयोगी पडते असे मेट म्हणतो. दुर्दैवाने शारीरिक अरोग्याइतके मानसिक आरोग्याबद्दल आपल्या देशात बोलले जात नाही. डिप्रेशन हा एक आजार आहे आणि फक्त "पोजीटीव विचार कर" म्हटले म्हणून प्रश्न सुटत नाही. मानसिक आरोग्यही आपण शारिरीक आरोग्यातीकेच गांभीर्याने घेतले पाहिजे, त्यावर चर्चा आणि प्रबोधन झाले पाहिजे त्यामुळे आपल्या प्रोफेशनल जीवनातील कित्येक गुंते सुटतील.


……………………………………………………………….
संदर्भ
1. http://www.assocham.org/newsdetail.php?id=4918  असोचेम सर्वे
2. http://timesofindia.indiatimes.com/india/One-in-10-Indians-depressed-dont-ignore-subtle-symptoms/articleshow/46731526.cms टाईम्स ऑफ इंडिया रिपोर्ट

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी