किंडल विरुध्द कागद



डिजिटल तंत्राज्ञानाने आज वाचन संस्कृती पण वेगाने बदलते आहे. कागदी पुस्तके आणि इ-बुक्स या दोन्हीचे समर्थक अगदी राजकीय पक्षांसारखे तावातावाने आपली बाजू मांडत असतात. हि इ-बुक्स आपल्या वाचन संस्कृतीवर काय परिणाम करतील हा एक महत्वाचा प्रश्न आहे. मात्र इ-बुक्स विरुध्द हार्ड कॉपी पुस्तक अशा संघर्षाचे जे चित्र रंगवले जाते ते निरर्थक आहे.
लेखकांच्या दृष्टीने पहिले तर इ-बुक्सचे वितरण आणिविक्री करणे फार सोपे आहे. या गोष्टींचा खर्च नसल्याने त्यांची किंमत पण कागदी पुस्तकांपेक्षा कमी असते. एका किंडल इ-रीडरमध्ये अशे शेकडो इ-बुक्स सहज रहातात त्यामुळे “इजी टू केरी” हा इ-बुक्सचा एक मोठा फायदा आहे. दुसर्या बाजूने हार्ड कॉपी पुस्तकाची पानं उलटण्याचा आनंद, नव्या पुस्तकाचा वास, मुखपृष्ठाच्या आणि इतर पानांच्या डिजाईनमधील बारकावे याची सर इ-बुक्स ला कधीही येणे शक्य नाही. असो असल्या घासून गुळगुळीत झालेल्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी हा लेख नाही.

हार्ड कॉपी जरूर वाचावी. इ बुक्स येऊनही आजच्या तरुणाईतील हार्ड कॉपी पुस्तकांची क्रेझ कमी झालेली नाही उलट नानावि पुस्तके येत आहेत आणि लोकप्रिय होत आहेत. महत्वाचे मुद्दे अंडरलाईन करणं, पुस्तकात स्टिकी नोट्स आणि खुणा घालून मार्क कारण यामुळे आपल्याला आपले संदर्भ पटकन सापडतात तेसे किंडलवर होत नाही.  बेतरी चार्ज होण्याची वाट न पाहता हार्ड कॉपी पुस्तके हवी तेव्हा काढून वाचता येतात. पण इबुक्स कडे एक खासियत आहे जी फार मोलाची ठरू शकते.

किंडल आणि इ-बुक्सचा सर्वात मोठा फायदा हा की सातासमुद्रापार असलेली पुस्तके तुमच्या हाताशी अल्प किमतीत येतात. एक उदाहरण देतो. मेजर जनरल जॉन कान्टवेल (John  Cantwell) हे एक ऑस्ट्रेलियन सैन्यातील अधिकारी होते. त्यांना १९९१ च्या इराक युद्धादरम्यान  पोस्ट ट्रोमेटिक स्ट्रेस डीसोरडर (PTSD) ने ग्रासले आपला आपल्याला मानसिक आजार आहे हे उघड केले तर सैन्यातील नोकरी जाईल य भीतीने त्यांनी चक्क वीस वर्षे हा आजार लपवून ठेवला. पुढे काही घटनांमुळे ते इतके हादरले कि त्यांना या आजारावर  इस्पितळात द्द्खल होऊन  सायकियेट्रीक उपचार घ्यावे लागले. मग त्यांनी सैन्यदलातील PTSD वर जागृती निर्माण करण्यासाठी एक पुस्तक लिहिले.

आता हे पुस्तक काही भारतासारख्या देशात सहज मिळणार नाही. इंटरनेटवरून हार्ड कॉपी विकत घ्यावी म्हटले तर त्याची किमत एक हजार दोनशे रुपयाच्या आसपास आहे पण किंडल वर हे पुस्तक केवळ ३०० रुपयात मिळते. अशा प्रकारे देशविदेशातील विविध पुस्तके आपण इ-बुक स्वरुपात स्वस्तात वाचू शकतो. मात्र आपले पुलं देशपांडे, आर के नारायण, अरविंद आदिगा, किंवा जुनी शेरलॉक होम्सची ओरिजिनल पुस्तकं अशा पुस्तकांना आपल्या बुकशेल्फ वरच जागा द्यावी. किंडल कि कागद हा प्रश किंडल विरुध्द कागद असा नसून कुठलं पुस्तक कुठल्या माध्यमातून वाचावं हा आहे. आणि इथेच इ-बुक्सचे आपल्या वाचा संस्कृतीस अमुल्य योगदान आहे.

Comments

Popular posts from this blog

ते दिन अजूनही आहेत!

सिंड्रेला

घरवापसी