Posts

गरज सकारात्मक मीडियाची

Image
आजचे जग म्हटले कि तुमच्या  डोळ्यासमोर कोणते चित्र उभे रहाते? भ्रष्टाचार, गुन्हेगारी, हेच आठवते का? जर मी तुम्हाला सांगितले कि आताचे जग खरे तर खूप सुंदर आहे आणि तुमच्यासमोर मीडियाद्वारे जाणूनबुजून वाईट चित्र उभे केले जात आहे तर? हे सत्य अहे. जागतिक स्तरावर गरीब श्रीमान्तामधील दरी कमी होत आहे. साक्षरता वाढते आहे, संशोधनातील प्रगतीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये मरणाऱ्या लोकांची संख्या निम्याहून घटली अहे. मेडिकल रिसर्चमुळे मृत्यू कमी होत आहेत. हे माझे स्वतःचे दावे नाहीत स्वीडिश मेडिकल डॉक्टर आणि स्टोकहोम मधील युनिवर्सिटी प्राध्यापक हान्स रोसलिंग (Hans Rosling ) यांनी या गोष्टी आकडेवारी सहित सिद्ध केलेल्या अहेत. यावर सुप्रसिध्द "टेड" कोन्फ़रन्स मध्ये बोलताना ते म्हणाले कि माध्यमे सेन्सेशनल बातम्यांच्या पाठी लागत आपल्यासमोर जगाचे वाईट चित्र उभे करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. आपण सकाळी पेपर उघडताच पहिल्या पानावर गैरप्रकार आणि दुर्घटनांच्या बातम्या आपले स्वागत करतात. टीव्हीवर तर कर्णकर्कश  संगीतासहित  दुर्घटनांची लाइव्ह कोमेंट्री चालू असते. अशा...

जगण्याचा वेग कमी करणे गरजेचे :कार्ल होनोरे

Image
धकाधकीचे रुटीन नाकारून शांत जीवनाचा आग्रह धरणाऱ्या ‘स्लो मुव्हमेंट विषयी याआधी या सदरात चर्चा झाली आहे. ”कार्ल होनोरे” लिखित “इन प्रेझ ऑफ स्लोनेस” या पुस्तकाचा संदर्भ त्या लेखात दिला होता. या चळवळीचे आजचे स्वरूप व भारत याविषयी इ-मेल द्वारे कार्ल होनोरे यांची एक छोटीशी मुलाखत मी ‘द गोवन’ तर्फे काही दिवसापूर्वी घेतली. ध्यानधारणा, योग, आयुर्वेद हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ खरे तर संतुलित जीवनाची गुरुकिल्ली आहेत आणि ते आपण सोडता कामा नये मत श्री होनोरे यांनी मुलाखतीदरम्यान मांडले. आपण ‘स्लो डाऊन’ होणे गरजेचे आहे असे तुम्हाला कधी व का वाटले?  मी आपल्या मुलाला रात्री गोष्टी वाचून दाखवत असे. मला वेळ कमी असल्याने काही ओळी, काही परिच्छेद किंवा काही पाने गाळून मी लवकरात लवकर गोष्टी संपवण्याचा प्रयत्न करायचो. साहजिकच  याचा माझ्या मुलाला खूप राग येई, त्यामुळे मग मलाही त्याचा राग येई. अशातच एक दिवस मला “वन-मिनिट बेडटाईम स्टोरी” अर्थात कोणतीही परीकथा एका मिनिटात मुलांना ऐकवण्याची सोय करणाऱ्या कलेक्शनची जाहिरात दिसली आणि वाटले व्वा! हे बरेच झाले. पण दुसऱ्याच क्षणी माझ्या मनात विचा...

चांगल्या संधी कुठे आहेत?: एक उदाहरण

Image
काही दिवसांपूर्वी गोव्यातील युवक युवतींची सरकारी नोकरीसाठीची धडपड पाहण्यास मिळावी. केवळ ५४ च्या आसपास असलेल्या पदांसाठी हजारो अर्ज आले, नोकऱ्या नाहीत अशी ओरड झाली. तसे पहिले तर नोकरीच्या अनेक संधी आहेत, पण आपल्याला त्यासाठी लागणारे किमान कौशल्य आहे कि नाही हे आजच्या युवकांनी तपासून पाहण्याची गरज आहे. यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी वृत्तपत्र जगतातील परिस्थितीचे एक उदाहरण देतो.  वृत्तपत्रातील काही सहकारी सांगतात कि कोणत्याही विषयांवर लेख लिहून पाठवा असे आवाहन केले कि काम सोपे होण्याऐवजी त्यांना उलट ताप सहन करावा लागतो.  दुर्दैवाने हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक  चांगले लेख लिहून पाठवतात. काही लेखांची भाषा इतकी वाईट असते कि ती सुधारण्यात बराच वेळ वाया जातो. त्यातून मग जे लोक चांगले काम करू शकतात त्यांच्यावर ताण पडतो. एकीकडे दर्जेदार लेखक सगळीकडे प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतात. मग आपण लेख पाठवूनही तुम्ही छापत नाही अशी तक्रार करत लोक आम्हालाच धारेवर धरतात. म्हणजे विकिपीडिया किंवा तत्सम वेबसाईटवरून उचलून लेख पाठवणार तुम्ही, उगाचच "आमच्या ८० वर्षाच्या आजीचा दिनक्रम" वगैरे ...

शिक्षणाचा उपयोग काय?

आपली शिक्षण व्यवस्था बेकार अहे. शिक्षणाचा तसा खूप काही  उपयोग नाही.  इथे शिक्षित लोक  नोकऱ्या  मिळवण्यासाठी धडपडतात मग शिक्षणाला महत्व का द्यावे? हा प्रश्न प्रत्येकाला सतावत असतो. आपण शाळा कॉलेज आणि युनिवर्सिटीत जाऊन काय शिकलो ते पण आपल्याला कधी धड आठवत नाही मग आपण तिथे जाउन काय केलं ? असं पण आपण बरेचदा स्वतःला विचारत रहतो. पण नोकरी आणि पैसा या पलीकडे शिक्षणाचे काही छुपे फायदे आहेत ज्यामुळे अशिक्षित लोकांच्या तुलनेत शिक्षित लोकांची "क्वालिटी ऑफ लाइफ़" चांगली असते. अमेरिकन  पत्रकार स्टीवन डबनर यांनी २००८ ते २०१० च्या आर्थिक मंदीच्या काळात हि गोष्ट प्रकाशात आणली. पहिला प्रश्न  हा कि आपण कॉलेज आणि युनिवर्सिटीत जाउन नेमकं काय करतो? ती जाडजूड टेक्स्टबुकं आणि कंटाळवाणी लेक्चर्स काय उपयोगाची असतात? यावर डबनर म्हणतात कि आपण कॉलेजमध्ये बुकं शिकत नहि. उलट प्राध्यापक आणि अवतीभवतीचे विद्यार्थी आणि तेथील वातावरण आपल्याला पुस्तकात कधीच मिळणार नाहीत अशा काही गोष्टी शिकवतात. इथे डबनर साहेब त्यांच्या स्वतःच्या जीवनातील दोन उदाहरणे देतात. एकदा फिल्ममेकिंगच्या वर्गात त्या...

ट्विटरची दुसरी बाजू

Image
सोशल मीडिया म्हणजे वेळ फुकट घालवण्याचे उद्योग असा बऱ्याच जणांचा समज असतो. ट्विटर आणि फेसबुकवर आपण कुठे गेलो, काय खाल्लं वगैरे अशी माहिती शेअर करण्यापलीकडेही बरंच काही करता येतं. मी स्वतः ट्विटरचा फॅन असल्याने प्रस्तुत लेखात ट्विटरचा चांगला उपयोग कसा करता येईल यावर काही सांगण्याचा इथे प्रयत्न करतो. ट्विटरवर एक ट्वीट केवळ १५० अक्षरात आटपावा लागतो (आता हि मर्यादा दुप्पट झाली आहे.) पण तितक्यातच लोक लघुकथा सुध्दा लिहितात. इतकंच नाही तर ट्विटरवर विविध विषयांना वाहिलेली चर्चासत्रे चालतात. आठवड्यातून एक दिवस आणि वेळ निश्चित करून जगभरातील लोक या चर्चासत्रात भाग घेतात. या चर्चना “ट्वीट चाट” म्हणतात आणि त्या त्या ट्वीट चाटचे ठराविक “हॅश टॅग” असतात ज्याद्वारे आपले ट्वीट त्या चाटरूममधील सर्व लोकांकडे पोचतात. उदाहरणार्थ #edchat हे शिक्षणविषयक चर्चासत्र दर मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री ९:३० ते १०:३० पर्यंत चालतं. यात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी शैक्षणिक सुधारणांवर चर्चा करतात. याविषयी तज्ञांचे लेख शेअर करतात तसेच जर तुम्हाला वाचनात रस असेल तर #amreading या हॅश टॅग वर तुम्ही नवनवीन ...

दुष्मंत चक्रा

Image
आपण तारुण्यात केलेल्या काही चुका पुढे आयुष्याभर आपल्याला छळत राहतात. अशाच एका मोठ्या चुकीची किंमत आज हे पुस्तक लिहिताना मी चुकवतो आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात चांगले वर्षभर काढूनही या शहराविषयी मी फार काही लिहू शकत नाही. कारण माझा बहुतांश वेळ मेक्स म्युलर भवन मध्ये जर्मन भाषा आणि संस्कृतीत गटांगळ्या खाण्यात जायचा. बाकरवडी, ठेचा, मिसळ अशा झणझणीत मराठी पदार्थांनी भरलेल्या ताटात हळूच लपून बसलेल्या विदेशी चॉकलेटसारखं छोटसं टुमदार ‘एम एम बी’ अस्सल देशी वळणाच्या पुण्यात जर्मन भाषा घोळवू पाहतं आहे. शिकणे आणि शिक्षण याविषयी शाळा नामक भयानक संस्थेने माझ्या मनात जे काही गैरसमज निर्माण करून ठेवले होते ते सर्व  ‘एम एम बी’ ने दूर केले. भाषा शिकणे म्हणजे केवळ निरस व्याकरण व  जाडजूड शब्दकोष नसून तो देश ती संस्कृती यामध्ये बुडून जाणे होय, हे येथील पहिले सूत्र. म्हणूनच कि काय,  ‘एम एम बी’त शिरलं की सर्वप्रथ लॉबीच्या एका कोपऱ्यात सतत  जर्मन DW चानेल दाखवणाऱ्या  टीव्हीचा आवाज कानावर पडायचा. संस्थेच्या मागे असलेल्या छोट्याशा परसात जर्मनांचा लोकप...

तीन अवलियांची कथा

पुण्यातील मेक्स म्युलर भवन मध्ये जर्मन भाषा शिकत असताना मला असे काही अवलिये भेटले कि स्वतःच्या सुशेगाद, मिळमिळीत जगण्याची एकीकडे शरम वाटू लागली त्याचप्रमाणे “हे जग फार निष्ठुर असते, पावला पावलाला तडजोड करावी लागते" वगैरे असले सिद्धांत कुठून जन्माला येतात तेही लक्षात आले. या साऱ्या गोष्टींचा साक्षात्कार मला होण्याचे कारण म्हणजे तीन पुणेरी तरुण. इथे आपण त्यांची नावे ठेऊ “चित्रकार,” “मेकानिक” आणि “इंजिनियर”. तिघेही उच्च मध्यमवर्गीय लोक. पण ध्येयासक्ती नावाचा प्रकार काय असतो, आणि ती नसली कि काय होते हे या त्रयीच्या आयुष्याकडे पाहून समजावे. तिघांचे वय वर्षे तेवीस. पण चित्रकार हा यातील सर्वात उत्साही आणि अनुभवसमृद्ध प्राणी. एक साधी स्कूटर घेऊन क्लासला यायचा. शाधासा बिनबाह्यांचा शर्ट, पाठीला एक सेक ज्याच्यात एक स्केचबुक, एक पेन आणि एक पेन्सिल. कधी कधी तर खिशात पाकीट देखील नसे. पण हा त्याचा अवतार फसवा होता. क्लासमध्ये एकटाच कोपऱ्यात चित्र काढत बसणार्यापैकी हा मनुष्य नव्हता. मिश्कील आणि खट्याळ स्वभावाचा हा माणूस पटकन काहीतरी विनोदी बोलून क्लासमध्ये धमाल उडवून देत असे. त्याला प्रवासाची ज...