चांगल्या संधी कुठे आहेत?: एक उदाहरण
काही दिवसांपूर्वी गोव्यातील युवक युवतींची सरकारी नोकरीसाठीची धडपड पाहण्यास मिळावी. केवळ ५४ च्या आसपास असलेल्या पदांसाठी हजारो अर्ज आले, नोकऱ्या नाहीत अशी ओरड झाली. तसे पहिले तर नोकरीच्या अनेक संधी आहेत, पण आपल्याला त्यासाठी लागणारे किमान कौशल्य आहे कि नाही हे आजच्या युवकांनी तपासून पाहण्याची गरज आहे. यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी वृत्तपत्र जगतातील परिस्थितीचे एक उदाहरण देतो. वृत्तपत्रातील काही सहकारी सांगतात कि कोणत्याही विषयांवर लेख लिहून पाठवा असे आवाहन केले कि काम सोपे होण्याऐवजी त्यांना उलट ताप सहन करावा लागतो. दुर्दैवाने हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक चांगले लेख लिहून पाठवतात. काही लेखांची भाषा इतकी वाईट असते कि ती सुधारण्यात बराच वेळ वाया जातो. त्यातून मग जे लोक चांगले काम करू शकतात त्यांच्यावर ताण पडतो. एकीकडे दर्जेदार लेखक सगळीकडे प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतात. मग आपण लेख पाठवूनही तुम्ही छापत नाही अशी तक्रार करत लोक आम्हालाच धारेवर धरतात. म्हणजे विकिपीडिया किंवा तत्सम वेबसाईटवरून उचलून लेख पाठवणार तुम्ही, उगाचच "आमच्या ८० वर्षाच्या आजीचा दिनक्रम" वगैरे ...