Posts

तीन अवलियांची कथा

पुण्यातील मेक्स म्युलर भवन मध्ये जर्मन भाषा शिकत असताना मला असे काही अवलिये भेटले कि स्वतःच्या सुशेगाद, मिळमिळीत जगण्याची एकीकडे शरम वाटू लागली त्याचप्रमाणे “हे जग फार निष्ठुर असते, पावला पावलाला तडजोड करावी लागते" वगैरे असले सिद्धांत कुठून जन्माला येतात तेही लक्षात आले. या साऱ्या गोष्टींचा साक्षात्कार मला होण्याचे कारण म्हणजे तीन पुणेरी तरुण. इथे आपण त्यांची नावे ठेऊ “चित्रकार,” “मेकानिक” आणि “इंजिनियर”. तिघेही उच्च मध्यमवर्गीय लोक. पण ध्येयासक्ती नावाचा प्रकार काय असतो, आणि ती नसली कि काय होते हे या त्रयीच्या आयुष्याकडे पाहून समजावे. तिघांचे वय वर्षे तेवीस. पण चित्रकार हा यातील सर्वात उत्साही आणि अनुभवसमृद्ध प्राणी. एक साधी स्कूटर घेऊन क्लासला यायचा. शाधासा बिनबाह्यांचा शर्ट, पाठीला एक सेक ज्याच्यात एक स्केचबुक, एक पेन आणि एक पेन्सिल. कधी कधी तर खिशात पाकीट देखील नसे. पण हा त्याचा अवतार फसवा होता. क्लासमध्ये एकटाच कोपऱ्यात चित्र काढत बसणार्यापैकी हा मनुष्य नव्हता. मिश्कील आणि खट्याळ स्वभावाचा हा माणूस पटकन काहीतरी विनोदी बोलून क्लासमध्ये धमाल उडवून देत असे. त्याला प्रवासाची ज...

त्रिशंकू

कॉलेजमधून बाहेर पडलेल्या आणि नवीन नोकरीला लागलेल्या प्रत्येक तरुणासाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला पुढची वरच्या पगाराची नोकरी शोधण्याची पाळी न येता त्या नोकरीची ऑफर येणे. तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मान आणि जास्त पैसे मिळणार असतात. पहिली नोकरी आता रेझ्युमेवर एक ‘एक्स्पीरियंस’ बनतो, आणि तुम्ही ऑफिसमध्ये ‘सिनियर’ बनण्याच्या दिशेने पाहिलं पाउल टाकता. मात्र इथे तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नसतो, पुढे जबाबदाऱ्या वाढणार असतात आणि असंख्य तडजोडी कराव्या लागणार असतात या गोष्टी तुम्ही वाढत्या पगार आणि स्टेटसच्या मोहापायी विसरून जाता. नेमकी हीच चूक मी पण केली. अंतरराष्ट्रीय राजकारणात मला असलेली रुची पाहून बोधीसत्वांनी स्वतः “अकलेचे तारे” या ते नव्यानेच संपादक बनलेल्या मराठी दैनिकात जागतिक बातम्या देणाऱ्या विभागाचा उपसंपादक म्हणून नोकरी ऑफर केली, आणि मोठ्या पगाराला भुलून मी ती तत्काळ स्वीकारली. इंग्लिश चेनल सोडून आता मी मराठीत शिरलो, आणि अक्षरशः अंधारात चाचपडू लागलो. ग्रामीण “भारत” आणि शहरी, “इंडिया” अशी एक मोठी दरी आपल्या देशात असल्याचं प्रसारमाध्यमे सांगत असतात. त्या दरीच्या मधोम...

बोधिसत्व

Image
“अनलर्निंग हा नवनिर्मितीचा पाया आहे” हे शब्द माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहेत. कोणत्याही नव्या समस्येला सामोरे जाताना अथवा नवीन काही निर्माण करताना यापूर्वी आपण जे काही शिकलो, आपल्या परिस्थितीबद्दल ज्या काही अपेक्षा आणि आडाखे आहेत ते सारे विसरून नव्या दृष्टीने प्रत्येक प्रश्नाकडे बघता यायला पाहिजे. ही गोष्ट मी आमचा महान न्यूज चेनल मध्ये माझ्या दोन वर्षाच्या कार्यकाळात शिकलो. हे नवनिर्मितीचं तत्व केवळ दोन टप्प्यांच्या सोप्या प्रोसेस मध्ये उलगडतं. पहिला, एखाद्या न्यूज किंवा फिल्म स्टोरीच्या कंटेंटबद्दल लोकांच्या काय अपेक्षा असतील त्यांची एक यादी बनवायची. आणि दुसरा, त्या अपेक्षांच्या पलीकडचे काहीतरी निर्माण करायचे. माझा बॉस, आमच्या महान न्यूज चानेलचा संपादकांनी या गोष्टी मला सांगितल्या. आज तोच विचार माझ्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. आपण कुठे चाललो आहोत याचा त्यांना उत्तम अंदाज होता. आजच्या जगात प्रेक्षक अधिक सजग झाला आहे, आणि निव्वळ करमणूकीपेक्षा ‘इन्फोटेन्मेंट’ हीच माहितीच्या युगात प्रेक्षकवर्ग धरून ठेवण्याची गुरुकिल्ली आहे असं त्यांचं मत होतं. त्याचबरोबर आपल्याला मिळणाऱ्या ...

बॉसिण

“जाऊ द्या हो. लहान आहे तो अजून" हा संवाद कुठल्या घरातला नसून एका ऑफिसात आहे, आणि खडीसाखरेसारख्या स्पष्ट, खणखणीत पण गोड आवाजातले हे शब्द आहेत एका बॉसिणीचे. तो लहान मुलगा - वय वर्षे तीस, कामाचा अनुभव सात वर्षे- असा मी. कामात काहीतरी चूक झाल्यावर भडकलेले पेपरच्या डिजाईन टीमचे हेड क्षणभर अवाक झाले. संपादक वगैरे सारखा कितीही मोठा हुद्दा  असला तरी “त्या मेडम” सारखी माणसांमध्ये उगाचच दुरावा निर्माण करणारी विशेषणे मी तिला कधीही लावू शकलो नाही. ती कायम “ती बोसिण” होती आणि आहे. पत्रकारितेतील माझी आतापर्यंतची सात वर्षे केवळ दोनच बॉसेसच्या हाताखाली सरली, आणि ते दोघेही अत्यंत प्रेमळ आहेत. त्यातील दुसरी आणि सध्याची हि बॉसिण. गव्हाळ वर्णाची, मिश्कील स्वभावाची, हसली कि किंचित गुलाबी छटा असलेल्या गालांना नाजूक खळ्या पडणारी बॉसिण कामात चूक झाली कि ओरड्ण्याऐवजी  “सोडून दे रे, उगाच जिवाला त्रास करून घेऊ नकोस” म्हणत समजूत काढते. तेव्हा मग केवळ तिच्या प्रेमापोटी कामाचा दर्जा उंचावतो. आरडाओरडा करून प्रश्न सुटत नसतात. उलट माणसं बुजतात आणि जास्त चुका करतात. हि आणि अशा अनेक गोष्टी तिनं मला शिकवल्या. च...

आमचे इथेच पंढरपूर!

Image
सोशल मीडियाद्वारे असो व प्रत्यक्ष भेटून व बोलून असो, माणसे जोडणे, नेटवर्क निर्माण करणे खूप महत्वाचे आहे असे माझे मत आहे. पण आज समृद्ध जीवन म्हणजे नेमके काय याच्या बदलत्या कल्पनांमुळे माणसे जोडणे सहज सोपे असले तरी ती टिकवून ठेवणे कठीण होत चालले आहे. आज लोक करियरपाठी पळत गोव्याहून दिल्ली आणि तिथुन पुढे वॉशिंग्टनला निघून जातात पण या नादात जुने शाळूसोबती, नातेवाईक, आई-वडील अशी माणसे आणि त्यांचा आधार तुटत जातो. असे पैशापाठी पाळण्यापेक्षा आपण निवांत एका जागी राहावे असे मला वाटते. मग आपल्याला एक दिवस अचानक शोध लागतो कि शाळेत आपल्या शेजारी बसणारा, आपल्या डब्यातले चोरून खाणारा मित्र दशकभरानंतर आज पोलीस इन्स्पेक्टर झाला आहे, आपल्याला कायम नोट्स उसने देणारी पुढल्या बाकावरील सुंदरी बँकेत जुन्या ओळखीवर पटकन आपली कामे करते आहे, आणि आपण रोज ऑफिसात जायला जी बस पकडतो त्याचा चालक दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या कॉलेजमध्ये शेवटच्या बाकावर बसून सर्वांची करमणूक करणारा त्या वेळचा ’कूल ड्यूड’ आहे. पैसा दिसेल तिथे उठून जाण्याने अशी संपर्कांची शक्तिशाली  ’नेटवर्क' आपण निर्माण करू शकत नाही. आता कोणी म्हणेल ...

ते दिन अजूनही आहेत!

Image
गावातील बालपण, खूप सुंदर होते, ते गाव तेथील नयनरम्य निसर्ग वगैरे आता लोप पावत चालला आहे, ते दिवस आता इतिहासजमा झाले आहेत असा सूर लोक का लावतात ते मला कळत नाही. आता शहरातील जगण्यात ते दिवस गेले हे मला अजिबात पटत नाही. गावाबद्दल किंवा त्या जुन्या दिवसांबद्दल खूप चांगलं चांगलं लिहिलं जातं पण आपलं सध्याचं जीवन त्याहून सुंदर आहे असं मला मनापासून वाटतं. माझं बालपण फोंडा, पणजी, मडगाव अशा शहरांमध्ये गेलं, आणि ते सुंदर मंतरलेले दिवस अजूनही संपलेले नाहीत. दुपारी शाळेतून घरी आलो कि आमच्या सोसायटीतील मित्रांच्या गराड्यात पत्ते आणि कॅरम खेळत दुपार निघून जायची. संध्याकाळी अर्थातच परत शाळेच्या मैदानावर फुटबॉल रंगायचा आणि रात्र टीव्ही आणि पुस्तकांच्या स्वाधीन असायची. महाभारत, शक्तिमान, जंगलबुक, त्याचबरोबर जीआयजो, ट्रान्सफॉर्मर्स, अशी कार्टून्स, आणि फ्रेंड्स सारख्या अजरामर मालिकांनि आमचं बालपण फुलवल. आज तीच पात्र सिनेमारुपात परत समोर येताना पाहून खूप आनंद होतो. उन्हाळ्याच्या सुटीत मडगावला मावशीकडे जाऊन पु.लं. देशपांडेची बटाट्याची चाळ, विश्वास पाटलांचे पानिपत अशा कादंबऱ्या आणि हार्डी बॉयस, फेमस फ...

D.O.E. (डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश)

Image
“क्रिएटीव रायटिंगचा अभ्यास करताना मला  राज्यशास्त्रातील कोरड्या सिध्दांताहून वेगळं काहीतरी शिकण्याची आणि स्वतःच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याची संधी मिळेल.” गोवा विद्यापीठाच्या इंग्लिश विभागात सर्जनशील लेखनाच्या वर्गात प्रवेशासाठी केलेल्या अर्जात मी लिहिलं होतं. माझ्या मते क्रिएटीव रायटिंग केवळ एक पोरखेळ होता. किचकट सिध्दांत नाहीत,  गुंतागुंतीचे तह, शिखर परिषदा लक्षात ठेवण्याचा त्रास नाही; काहीतरी अचाट काल्पोकाल्पित कथा खरडून दिल्या कि झालं! राज्यशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्याकडे धोकेबाज राजकारणी आणि गुप्तहेरांच्या सुरस कथांचा भरपूर साठा होता. त्याच्या बळावर या इंग्लिश विभागातल्या कविता आणि नाटकं वाचणाऱ्या आणि परीकथांमध्ये रमणाऱ्या लोकांना मी सहज मात देईन असा मला विश्वास होता. आपलं मूळ क्षेत्र  सोडून इथे भलतीकडे घुसून आपण मोठी चूक करत आहोत हे माझ्या गावीही नव्हतं. या चुकीचं गांभीर्य माझ्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. इंग्लिश विभागातील माझी कामगिरी शेक्सपिअरच्या शोकांतीकेप्रमाणे दिवसागणिक करुण होत चालली होती. आमच्या राज्यशास्त्र विभागात एक गोष्ट आ...